Wednesday, 7 March 2012

हृदय गुंतता तुझ्यात !


प्रीतीची रीत नवी आज ठेवितो मनात 
देहभान हरपले हृदय गुंतता तुझ्यात !

मधुमिलना आतुरले हर्ष ह्या स्वरात 
प्रेमाने मोहरले हृदय गुंतता तुझ्यात !

सहवासातून अपुल्यामधला स्नेह वाढतो 
नभाच्या पलीकडून चंद्र दृष्ट काढतो 
स्पर्शाने फुलला मधुमास जीवनात 
देहभान हरपले हृदय गुंतता तुझ्यात !

पाहण्यासाठी तुला नयन हे आतुरले 
दृष्टीस तू पडता मी लाजुनी बावरले
लाटांना उधाण येई आज सागरात 
प्रेमाने मोहरले हृदय गुंतता तुझ्यात !

ओढ तुझी लागली तुझ्यात रमलो मी
भेटण्यास तुला प्रिया कितीक सजले मी
अंतरी समावलो तरी रात्र जाई विरहात
आताशा स्वप्नात झुरतो हृदय गुंतता तुझ्यात !

No comments:

Post a Comment