Wednesday, 7 March 2012

विसरू दे त्या क्षणांना !


नको तुझी आठवण नको ती भावना 
सहवास तुझा संपला आता विसरू दे  त्या क्षणांना !
फुल गेले कोमेजून तरी साद घालिते एक कळी
नाव तुझे ऐकताच उमटे गाली माझ्या गोड खळी
प्रेम मधुर कल्पना कसे हे सांगू मी जनांना? 
सहवास तुझा संपला आता विसरू दे  त्या क्षणांना !!
हुरहूर येथे जीवा लागली, नाहीस तू परि सावरण्या
काहूर माझ्या मनीचे अल्गदसे आवरण्या
एकटी बसून मी छेडिते विरह सुरांना...

No comments:

Post a Comment